¡Sorpréndeme!

Lokmat International News | दारूसाठी दुकानात रणगाडा घुसवला पहा हा Video | Lokmat News

2021-09-13 0 Dailymotion

रशियामध्ये दारू मिळवण्यासाठी धडपड करणाऱ्या एका व्यक्तीने तिथल्या सैनिकी शाळेतील रणगाडा चोरला आणि दारूच्या दुकानात घुसवला. १० जानेवारीची ही घटना असून हा दारूडा रणगाडा चोरून इतक्या लांबवर आलाच कसा याची चौकशी सुरू करण्यात आली आहे. ही घटना मुरमंस्क भागातील अपटीटी शहरातील असून या दारूड्याला अटक करण्यात आली आहे.या दारुड्याने रणगाडा सुपरमार्केटमध्ये घुसवल्याने दुकानाचं बरंच नुकसान झालं आहे. या दारूड्याचं नाव समजू शकलेलं नाही मात्र मिळालेल्या माहितीनुसार त्याला अटक करण्यापूर्वी त्याने दारूची एक बाटली चोरली होती.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews